Thursday, May 23, 2024

/

क्रांती मोर्चात लक्ष वेधून घेण्यासाठी अशीही शक्कल !

 belgaum

बेळगाव दि ९ : एक मराठा लाख मराठा क्रांती मोर्चाचे लोण आता युवकातही पसरले आहे . मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले जावे यासाठी तरुणाईने अनोखी शक्कल लढविली आहे . आपल्या डोक्यावरील केसा मध्ये केस कोरून एका मराठा लाख असे लिहून घेतले आहे .

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावातील रजत हेयर कटिंग सलून हे केश कर्तनालय चालवणाऱ्या रजत शिवनगेकर या २० वर्षीय युवकाने हा अनोखी हेयर स्टआईल बनवण्यास सुरुवात केली आहे . आज सकाळ पासूनच त्याच्या दुकानात अनेक युवक मराठा क्रांती मोर्चा वेगळ्या पद्धतीचे कटिंग करून घेण्यासाठी विचारणा करत होते त्या नुसार त्याने अशी केश रचना बनविण्यास  सुरु केली आहे . आज कालच्या युवकात वेगवेगळ्या प्रकारच्या हेयर स्टईलच्या वेड लागलेले असत  मराठी क्रांती मोर्चाच्या आयोजनाच्या पाश्वभूमीवर युवकांनी ही वेगळी केश रचना साकारायला सुरुवात केली आहे . त्याने कंग्राळी गावातील गजानन पाटील नावाची युवकाची शी केश रचना सर्वात पहिला केली त्यानंतर आता त्याला याची मागणी वाढू लागली आहे .

२० वर्षीय रजत शिवनगेकर यांने बेळगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले की साध कटिंग करायला १५ ते २० मिनिट लागतात मात्र एक मराठा लाख मराठा केसातून कोरीव काम करून ब्लेड ने काढायला साधारण अर्धा तास ते ४५ मिनिट लागतात सध्या क्रांती मोर्चा फड असल्याने मी हे कटिंग आवडीने करत आहे याला नॉर्मल कटिंग पेक्षा जरा जास्त फी आकारत आहे . हळू हळू एकाच बघून एक युवक अस कटिंग करून घ्यायला माझायाकडे येत आहेत अस रजत म्हणाला .

 belgaum

 

या प्रकारची हेयर कटिंग करून घेण्यासाठी संपर्क : रजत शिवंनगेकर कंग्राळी खुर्द   ०७७९५८०५२६९

diffrent hair style kangrali

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.