Sunday, May 19, 2024

/

मराठा सेन्टरच्या जवानाकडून शिवरायांना वंदन

 belgaum

बेळगाव दि १९:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री  छत्रपति  शिवाजी  महाराजांची ३८७  वी  जयंती  आज  बेळगावातील  मराठा लाईट  इन्फंट्री  रेजिमेंटल   केंद्रात मोठ्या  उत्साहाने  साजरी  करण्यात आली . सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आणि प्रेरणा घेऊन लढणाऱ्या या मराठा  सेंटर मधील  जवानांनी  शिवरायांच्या घोषणांचा जयघोष केला .

maratha centre shiv jayanti

मराठा  सेंटरचे  ब्रेगेडीयर प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात् जवानानी मिलिटरी महादेव शिव तीर्थावरील  अश्वारूढ  शिवाजी  महाराजांच्या  पुतळ्यास हार अर्पण केला . यावेळी जवानानी  शिवाजी  महाराजांचा जाज्वल्य इतिहास वर आधारित  महाराजांची  शौर्य कथा सांगणारा  पोवाडा  सादर  केला . पोवाडा कार्यक्रमावेळी   उपस्थित  जवानांनी  शिवाजी  महाराजांच्या  जय घोष  केला. शेवटी उपस्थित  जवान जे सी ओ सेंटर च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय”असा जयघोष करून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.