बेळगाव दि ८: आगामी 16 फेब्रुवारी रोजी बेळगावात आयोजित मराठी क्रांती मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार मजगाव येथील बैठकीत करण्यात आला . या बैठकित दीपक दळवी माजी आमदार मनोहर किनेकर,प्रकाश शिरोळकर माजी उप महापौर रेणु मुतगेकर यावेळी यांनी आपले विचार मांडले . शरीरराची एक पार्ट जसा महत्वाचा तश्याच 18 पगड़ जाती ना महत्त्व आहे सिमा प्रश्नाचा हां मोर्चा सर्वा 12 बलुतेदार आणि 18 आलुकेदार नी मिळून यशस्वी करुयात अस मत युवा नेते संजय सातेरी यांनी व्यक्त केले . मजगावात मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या बैठकीत महिलांची संख्या लक्षणीय होती .
Trending Now