बेळगाव दि ८ : १६ फेब्रुवारी बेळगावात मराठी आणि मराठा क्रांती मोर्चास सोमवारी पोलिसांनी परवानगी दिल्या नंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चा मार्गांची पाहणी केली .
पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी(गुन्हा) यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकाऱ्यांनी मार्ग पायी चालत फिरून काढला आणि कश्या पद्धतीने मोर्चा दिवशी बंदोबस्त ठेवता येईल याची चाचपणी केली. कॅम्प डी एस पी जय कुमार , ट्राफिक निरीक्षक जावेद मिशापुरी देखील यावेळी उपस्थित होते . यावेळी मोर्चा संयोजक प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, विकास कलघटगी , विजय होनगेकर उपस्थित होते .