बेळगाव दि ८ :शिव सेना प्रमुख नेहमी मराठी चळवळीच्या आधार बनले त्याच धर्तीवर पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे देखील वाटचाल करत आहेत त्यामुळे सीमा भागातील मराठी माणसाला जोवर न्याय मिळत नाही तो पर्यंत सेना नेहमीच मराठी माणसाच्या पाठीशी राहील अशी ग्वाही शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केल
बेळगावात सम्राट अशोक चौक येथे शिव सेनेच्या वतीने बेळगाव प्रश्नी मुंबई हुतात्म्य पत्करलेल्या ६७ जणांना हुतात्म्यांना अभिवादन केल्या नंतर बोलत होते . बेळगाव प्रश्नी अन्यायी नेमलेला महाजन आयोग गाडण्यासाठी शिव सेनेन च्या वतीने ८ फेब्रुवारी १९६९ रोजी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ६७ जणांना हुतात्म्य पत्रक्रव लागल होत . या हुतात्म्यांना दरवर्षी शिव सेने कडून अभिवादन करण्यात येत यावर्षी देखील सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आल . यावेळी आमदार अरविंद पाटील ,संभाजी पाटील , महापौर सरिता पाटील उपमहापौर संजय शिंदे , माजी आमदार मनोहर किणेकर शिवाजी सुंठकर , टी के पाटील शिव सेनेचे प्रकाश शिरोळकर , बंडू केरवाडकर , दिलीप बैलुरकर आदी उपस्थित होते .
सिंहगर्जना युवक मंडळा कडून अभिवादन
कोनवाळ गल्लीतील सिंह गर्जन युवक मंडळाच्य वतीने देखील ६७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आल महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केल यावेळी एकीकरण समितीचे किरण गावडे , उपाध्यक्ष टी के पाटील , शिवाजी सुंठकर , नेताजी जाधव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत देखील उपस्थित होते .