बेळगाव दि ३१ मागील ४० वर्षांपासून बेळगावात कार्यरत आणि खवय्यांची पसंद ठरलेले हॉटेल न्यू ग्रँड ने मंगळवार पासून एक्झिट घेतली आहे. हॉटेलची जागा मूळ मालक असलेल्या महिला विद्यालय मंडळाच्या ताब्यात जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या संदर्भात न्यायालयीन लढा सुरु होता. न्यायालयाने जागा रिकामी करण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी सकाळ पासून हॉटेल बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सध्या सर्व साहित्य बाहेर काढण्यात आले आहे.
न्यू ग्रँड चे पदार्थ सर्वदूर प्रसिद्ध होते. तेथील उप्पीट आणि दक्षिणी पदार्थांसाठी कायम गर्दी व्हायची. हॉटेल ग्रीन नंतर आता बेळगावच्या हॉटेल विश्वातील आणखी एक तारा निखळला आहे. याची खंत मात्र खवय्यांना राहणार आहे.
न्यू ग्रँड दुसऱ्या जागेत सुरु होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.