Wednesday, May 8, 2024

/

‘मलप्रभाला मिळणार आठ लाखांचे बक्षीस

 belgaum

इंडोनेशिया येथील जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत कुरास मध्ये कांस्य पदक मिळविलेल्या बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिला कर्नाटक राज्य सरकारने 8 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

जिल्हा पंचायतीच्या स्थाई समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

Malprabha jadhav

 belgaum

तुरुमुरी येथी मलप्रभा हिचे बैठकीत टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी मलप्रभा ने मिळवलेले यश जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचं सांगितले.

शुक्रवारी मलप्रभा दिल्ली येथे येणार आहे तर तेथून बंगळूर ला येऊन त्यानंतर बेळगावला परतणार आहे.राज्य सरकारने मलप्रभाला पदक मिळवणाऱ्या खेळाडूला 8 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी देखील मलप्रभा यांच्या आई वडिलांशी दूरध्वनी चर्चा करून अभिनंदन केले होते तर बेळगाव जिल्हा प्रशासनाने देखील मलप्रभाच्या आई वडिलांचा सत्कार केला होता.मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी भविष्यात मलप्रभाला लागणारा ट्रेनिंग खर्च देऊ असे आश्वासन दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.