बेळगाव शहरातील कॅम्प भागांत तीन वर्षे सात महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्त्याचार केल्याची घटना घडल्यामुळे या भागांत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती ती मंगळवारी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी गेल्या दहा दिवसांपूर्वीच भाड्याच्या घरात रहायला आला होता 20 वर्षीय रोशन डेव्हिड असे त्याचे नाव आहे. त्याच भागातील ल तीन वर्षे सात महिने वयाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी आरोपी 13 वर्षीय बालकास आणि 20 वर्षीय रोशन डेव्हिड यास अटक करण्यात आली आहे.या घटने नंतर कॅम्प भागांत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी या भागात धाव घेतली होती व पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आला होता. या प्रकरणी कॅम्प पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक धर्मट्टी अधिक तपास करत आहेत.




