ऑनलाइन संमेलनाचे उद्घाटक असणार संजय राऊत

0
7
Ravi patil
 belgaum

कोरोनाच्या महामारीमुळे बेळगाव मध्ये दरवर्षी होणारे साहित्य संमेलन यात खंड पडू नये म्हणून तंत्रज्ञानाची जोड घेऊन बेळगाव सीमाभागातील हे पहिलेच ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन दोन सत्रात घेवून मराठी भाषा, संस्कृती संवर्धनासाठी व नवोदित कवींना व्यासपिठ म्हणून आयोजन केले आहे असे मत सीमाकवी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखेच्यावतीने ऑनलाईन बेळगाव मराठी साहित्य संमेलन यशस्वी नियोजन करण्यासाठी बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची बैठक डी.बी.पाटील फोटो स्टुडिओ येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील होते .

कोरोनाच्या महामारीमुळे साहित्य संमेलन घेणे यावर्षी ही मोठी अडचण झाली असल्याकारणाने दरवर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनात यावर्षी खंड पडू नये म्हणून ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेऊन पहिल्या सत्रात उद्घाटनाचा सत्र यामध्ये संमेलनाध्यक्ष व उद्घाटक मार्गदर्शन करणार आहेत तसे दुसऱ्या सत्रात कवीसंमेलन आयोजित करून या कवी संमेलनाचे अध्यक्ष मार्गदर्शन करून नवोदित कवींना याठिकाणी कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे .यामध्ये प्रामुख्याने बेळगाव सीमाभाग , विदर्भ ,मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र ‘ कोकणसह मुंबई या विभागातील कवी सहभागी होणार आहेत.

 belgaum

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बेळगाव येथे रविवार दि.25 जुलै रोजी सकाळी ११ वाजता गुगलमीटव्दारे ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम पचिंद्रे भूषवणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आयोजित हे ऑनलाइन बेळगाव मराठी साहित्य संमेलन गुगल मीट व्दारे असून याचे थेट प्रेक्षपण फेसबुक व युट्यूब तसेच समाज माध्यमांवर करण्यात येणार आहे. साहित्य संमेलन पाहण्यासाठी साहित्य रसिकांना लिंक दिली जाणार आहे.

या संमेलनाचे उद्घाटक म्हणून दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक , शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत व स्वागताध्यक्ष म्हणून अभामसा परिषदचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष , चित्रपट निर्माते व साहित्यिक शरद गोरे असणार आहेत.

या बैठकीमध्ये बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. संयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसंत संजय मोरे , संजय गुरव , बेळगाव महिला जिल्हा उपाध्यक्ष अरुणा गोजे -पाटील प्रा.मनीषा नाडगौडा रोशनी हुंद्रे , सविता व्यसने ,नेत्रा मेणसे , सुनिता बडमंजी सदस्या उपस्थित होत्या.शेवटी सुत्रसंचालन व आभार स्मिता चिंचणीकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.