belgaum

प्रज्वल रेवण्णाची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याची बंगळुरू येथील परप्पना अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारागृहात बेकायदेशीरपणे मोबाईल फोन आणि सिमकार्ड वापरल्याचे उघडकीस आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कारागृह पोलीस महासंचालक (डीजीपी) आलोक कुमार यांच्या आदेशानुसार प्रज्वल रेवण्णा यांना बेळगावात हलवण्यात येत असून, शुक्रवारी सायंकाळी किंवा रात्रीपर्यंत प्रज्वल रेवण्णा याला हिंडलगा कारागृहात आणले जाण्याची शक्यता आहे.

 belgaum

अलीकडेच परप्पना अग्रहार कारागृहातील प्रज्वल रेवण्णा याच्या खोलीत मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळून आले होते. या प्रकरणी परप्पना अग्रहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली होती.

कारागृहात नियमबाह्य पद्धतीने मोबाईलचा वापर केल्याच्या या गंभीर प्रकरणानंतर त्याची हिंडलगा कारागृहात बदली करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.