belgaum

शिवसेनेचे विजय देवणे यांच्यासह नेत्यांचे वारंट रिकॉल

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून भगवा ध्वज फडकविल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना बेळगाव येथील जेएमएफसी चौथ्या न्यायालयाने वारंट रिकॉल केले आहे. न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतर संबंधित नेते बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर झाले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

२१ जानेवारी २०२१ रोजी बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर कन्नड समर्थक संघटनांकडून कन्नड ध्वज उभारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मराठी भाषिक समुदायाचे सदस्य हा ध्वज हटवतील, असे सांगत महाराष्ट्रातील शिवसेना नेते विजय देवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकविल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेमुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या प्रकरणात करण्यात आला होता.

या प्रकरणातील सुनावणीसाठी न्यायालयात गैरहजर राहिल्याने संबंधित नेत्यांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी विजय देवणे, संग्रामसिंग कुपेकर देसाई, सुनील शिंत्रे आणि संतोष मळवीकर हे न्यायालयात हजर झाले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर चौघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

 belgaum

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय देवणे यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा गेल्या ७० वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा दिला आहे. कितीही अडचणी आल्या तरी मराठी जनतेच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या प्रकरणात वकील म्हणून शामसुंदर पत्तार, हेमराज बेंचनावर, विशाल चौगुले आणि ज्योतिबा पाटील यांनी काम पाहिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.