belgaum

चार दिवसांनी सापडला युवकाचा मृतदेह

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील होनकल येथील बेपत्ता 18 वर्षीय युवक मनोज मंगेश देसाई याचा चार दिवसांपासून सुरू असलेला शोध अखेर मंगळवारी (दि. 22 सप्टेंबर) संपला. बेळगाव-गोवा महामार्गावरील कुपटगिरी गावाजवळ मलप्रभा नदीपात्रात दुपारी सुमारे 2.15 वाजता मनोजचा मृतदेह आढळून आला. या घटनेने देसाई कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मनोज हा शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याच रात्री सुमारे 8 वाजता त्याचा मोबाईल फोन बंद झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.

त्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला असता, कुपटगिरी गावाजवळील मलप्रभा नदीवरील पुलाखाली मनोजची दुचाकी आढळून आली.

 belgaum

दुचाकी सापडल्याने नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशामक दलाचे जवान आणि खासगी शोध पथके नदीत मनोजचा शोध घेत होती. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी शोधमोहीमेदरम्यान मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.