belgaum

परतीच्या पावसाची चाहूल.. हलक्या सरींनी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज अखेर बेळगाव शहर आणि परिसरात पुनरागमन केले आहे. सकाळपासूनच ढगाळ हवामान तयार झाले असून दुपारच्या सुमारास काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे वातावरणात काहीसा गारवा आला असून कडक उन्हामुळे सुकत असलेल्या खरीप पिकांना अंशतः आधार मिळाला आहे.

गेल्या तीन-चार आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाऊस नसल्याने भात, सोयाबीन आणि ऊस यांसारखी महत्त्वाची पिके सुकू लागली असून शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. शासनानेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्ह्यातील काही भागांत अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे.

 belgaum

मात्र आजच्या तुरळक सरींनी शेतातील सुकणाऱ्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले असले, तरी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांचा पूर्ण दर्जा सावरण्यासाठी अजूनही मुसळधार पावसाची नितांत गरज आहे.

सध्या उत्तर-मान्सून आणि परतीच्या पावसाचा काळ मानला जाणारे नक्षत्र सुरू आहे. हस्त आणि त्यानंतर येणाऱ्या चित्रा नक्षत्रात सामान्यतः परतीचा पाऊस सक्रिय होतो. आगामी दिवसांत परतीचा पाऊस जोर धरेल आणि जलसाठ्यांसह करपणाऱ्या पिकांना पूर्ण दिलासा मिळेल, अशी आशा शेतकरी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.