belgaum

अनंत चतुर्दशीच्या दिवशी इयत्ता नववी पर्यंतच्या परीक्षा पुढे ढकला;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी होणारी इयत्ता नववी पर्यंत च्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ आणि निवासी जिल्हाधिकारी हुणकेरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

सध्या बेळगाव तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सत्र परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने गणेश विसर्जनाची मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गणेशोत्सवात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 belgaum

गणेशोत्सव हा १२ दिवसांचा महत्त्वपूर्ण उत्सव असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन परीक्षा वेळापत्रकात बदल करावा, तसेच पर्यायी दिवशी परीक्षा घेण्यात यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे महांतेश कोळूचे, वकील वैभव कुट्रे, माजी नगरसेवक अनिल पाटील, विनायक पाटील, हरीबसू धुळजी, जोतिबा भातकांडे, राकेश कोनो आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.