belgaum

वडगावमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा संताप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वडगाव परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून पावसामुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्यावरून पायी चालणेही अत्यंत कठीण झाले असून स्थानिक महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मंगाईची यात्रा होऊन महिना उलटला आहे. यात्रेपूर्वीच रस्ता दुरुस्त करून स्वच्छ करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, यात्रा संपल्यानंतरही प्रशासनाकडून या रस्त्याची साधी पाहणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही चिखल आणि घाणीतूनच ये-जा करावी लागत आहे.

गणेशोत्सव तोंडावर आला असून गणपतीच्या मूर्ती, वाहने आणि नागरिकांची मोठी ये-जा सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता प्रशासनाने तातडीने सुस्थितीत करून द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

 belgaum

यावेळी द्राक्षायणी अक्कतंगेरहाळ, छाया सावंत, सुवर्णा कंग्राळकर, पद्मा कट्टीमणी, ललिता एम्मी, कविका पोतदार, धनश्री भातकांडे, सुविता अक्कतंगेरहाळ, अर्चना बाबशेट, शालन हवालदार, पूनम अनवेकर, माया कंग्राळकर,

सरस्वती हारलगे आणि अनुराधा कुराडे आदी महिलांसहित स्थानिक रहिवासी उपस्थित होते. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.