belgaum

दोन दशकांनंतर आरोपी पोलिसांच्या हाती

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : तब्बल २० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीला कागवाड पोलिसांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. २००६ मध्ये दाखल झालेल्या चोरीच्या तब्बल ११ गुन्ह्यांमध्ये तो आरोपी होता. प्रगत तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

सागर महादेव पोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील रहिवासी आहे. सध्या तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जैतापूर गावात राहत होता.

२००६ मध्ये दाखल झाले होते ११ गुन्हे

सागर पोळे याच्याविरोधात कागवाड पोलीस ठाण्यात २००६ साली चोरीचे तब्बल ११ गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये गुन्हा क्रमांक 05/2006, 100/2006, 116/2006, 119/2006, 120/2006, 122/2006, 124/2006, 126/2006, 127/2006, 128/2006 आणि 138/2006 यांचा समावेश आहे.

 belgaum

या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तो न्यायालयात हजर राहिला नाही. त्यानंतर तो फरार झाला आणि जवळपास दोन दशके पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

तांत्रिक माहितीच्या आधारे साताऱ्यात शोध

फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामाराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसारगी आणि अथणी विभागाचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

अथणी सर्कलचे सीपीआय संतोष हल्लूर आणि कागवाड पोलीस ठाण्याचे पीएसआय राघवेंद्र खोत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. प्रगत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सातारा जिल्ह्यातील जैतापूर येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पथकाने तेथे कारवाई करून सागर पोळे याला अटक केली.

अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

या कारवाईत एम. एम. जांबागी (CPC 2817), आर. के. धुमाळे (CPC 3222), एस. बी. मगदूम (CPC 3839) आणि बेळगाव जिल्हा पोलीस तांत्रिक कक्षाचे विनोद हक्कणावर यांनी सहभाग घेतला.

जवळपास दोन दशकांपासून फरार असलेल्या आरोपीला शोधून अटक केल्याबद्दल बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकाचे कौतुक केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.