belgaum

एपीएमसी पोलिसांनी उघडकीस आणल्या घरफोड्या

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना बेळगाव शहरातील एपीएमसी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून ६ लाख ११ हजार ५२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ५ लाख ८९ हजार ३८० रुपये किमतीचे ४१.४३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २२ हजार १४६ रुपये किमतीचे ९३.४५ ग्रॅम चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.

कुमारस्वामी लेआउट येथील रहिवासी शाबू दिलीप कांबळे यांनी ४ मार्च २०२५ रोजी त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २३/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान हे प्रकरण ‘सी’ नापत्तीत दाखल झाले होते. मात्र, प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी न्यायालयाकडून आदेश मिळवल्यानंतर पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग दिला.

 belgaum

पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलिस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक) आणि मार्केट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यू. एस. अवटी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली.

२२ ऑगस्ट २०२६ रोजी नंदिश ऊर्फ बेणकी नंद्या उमेश सक्रप्पनवर (वय २९, रा. नागशेट्टीकोप्प, केश्वापूर, हुबळी) आणि मंजुनाथ ईराप्पा बंडीवड्डर (वय २८, रा. देशपांडे नगर, मारुती नगर, हुबळी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत दोन्ही आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुख्य आरोपी नंदिश याने आणखी दोन घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणांचा संबंध एपीएमसी पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ६६/२०२५ आणि ८९/२०२६ यांच्याशी असल्याचे समोर आले आहे.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची एकूण किंमत ६ लाख ११ हजार ५२६ रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिस पथकाचे कौतुक

या कारवाईत एपीएमसी पोलिस ठाण्याचे पीएसआय एस. के. होळेन्नवर, विठ्ठल हावन्नवर, एएसआय एम. ए. पाटील, तसेच बसवराज नरगुंद, खदारसाब खानम्मनवर, रफीक मुजावर, शिवाजी चव्हाण, प्रशांत रायबागकर, रमेश पाटील यांनी सहभाग घेतला.

तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशीध आणि दीपक दोडगोणी यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि पोलिस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक) यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.