बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांकडून गणेश मंडळांना विविध परवानग्या मिळवून देण्यासाठी सिंगल विंडो अर्थात एक गवाक्ष व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. 31 ऑगस्ट 2026 पासून शहरातील 12 पोलीस ठाण्यांमध्ये या केंद्रांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेश मंडळांना मंडप उभारणी, विद्युत जोडणी, अग्निसुरक्षा, पोलीस परवानगी तसेच इतर आवश्यक परवानग्यांसाठी विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये, यासाठी सिंगल विंडो पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
मागील वर्षीही बेळगाव शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सिंगल विंडो केंद्रे सुरू करण्यात आली होती. पोलीस, महानगरपालिका, हेस्कॉम, अग्निशमन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित परवानगी प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी घेणे अधिक सोयीचे झाले होते.
सिंगल विंडो केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचारी
| क्र. | पोलीस ठाणे | अधिकारी / कर्मचारी | हुद्दा | मोबाईल क्रमांक |
|---|---|---|---|---|
| 1 | मार्केट | श्रीमती अनिता हंचिनाळ | डब्ल्यूपीसी-1968 | 9591985305 |
| 2 | माळमारुती | श्री. बसवराज कुल्लोळी | सीपीसी-1971 | 9591666576 |
| 3 | शाहापूर | श्री. महावीर ठकाई | सीएचसी-1386 | 9739934813 |
| 4 | एपीएमसी | श्रीमती यशोधा सूर्यवंशी | डब्ल्यूपीसी-1603 | 9606787613 |
| 5 | खडेबाजार | श्री. एम. व्ही. कुरवत्तिमठ | एएसआय | 8123506816 |
| 6 | कॅम्प | श्री. बी. व्ही. करौशी | एएसआय | 9844182404 |
| 7 | टिळकवाडी | श्री. उमेश मुदवी | सीपीसी-1809 | 8494834783 |
| 8 | उद्यमबाग | श्री. महेश वडयेर | सीपीसी-1595 | 9535666921 |
| 9 | बेळगाव ग्रामीण | श्री. चंद्रकांत गुट्टी | सीपीसी-2012 | 9611726585 |
| 10 | काकती | श्री. विठ्ठल उळवी | सीपीसी-6020 | 9731208642 |
| 11 | मारिहाळ | श्री. एन. के. पिडाई | — | 8095004590 |
| 12 | हिरेबागेवाडी | श्री. एस. एम. अळळी | सीपीसी-1430 | 974265443 |
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत असल्याने कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि गणेश विसर्जन मिरवणुकांचे नियोजन यावर पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित सिंगल विंडो केंद्राशी संपर्क साधून आवश्यक परवानग्या वेळेत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याने गणेश मंडळांना परवानगी प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे.





