बेळगाव लाईव्ह: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कळ्ळोळी गावाच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गुजनट्टी गावातील रमेश हणमंत बंट्रोळी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर कळ्ळोळी येथील बनाप्पा रामचंद्र वडेर याच्यावर खुनाचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बंट्रोळी आणि बनाप्पा वडेर यांच्या पत्नी लक्ष्मी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. दोघे एकत्र असलेला फोटो रमेशने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. हे स्टेटस पाहिल्यानंतर बनाप्पा वडेर संतप्त झाला.
त्यानंतर सोमवारी कळ्ळोळी गावाच्या हद्दीतील शेतात रमेशवर बनाप्पाने कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात रमेशच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर वार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेप्रकरणी घटप्रभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





