belgaum

हेरॉईन विक्री करणाऱ्या आरोपीला अटक!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सीसीबी पोलीस पथकाने कारवाई करत हेरॉईन या मादक पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

१३ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीसीबीचे पोलीस निरीक्षक (PI) मंजुनाथ नाईक, पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने मंडोळी रस्त्यावरील विजया ढाब्याजवळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी आफताब महंमदहनीफ अत्तार (वय २६, रा. अन्सार गल्ली, पीरनवाडी, बेळगाव) याला अमली पदार्थांची विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले.

पोलीस पथकाने आरोपीकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १०५ हेरॉईनच्या पुड्या (एकूण १४.१३ ग्रॅम) आणि १० हजार रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान सदर हेरॉईन महाराष्ट्रातील मुंबई येथील कोळीवाडा परिसरातील ‘शाहीन उर्फ अम्मा’ नावाच्या महिलेकडून आणल्याची कबुली आरोपीने दिली.

 belgaum

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी सीसीबी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.