belgaum

बेळगावच्या अमनची राष्ट्रीय जलतरणात चमक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचा युवा जलतरणपटू अमन वसुंधरा अभिजित सुनगार याने ५२व्या ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत कर्नाटकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भुवनेश्वर, ओडिशा येथे नुकत्याच पार पडलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अमनने दोन रौप्यपदकांची कमाई केली.

जैन पीयू कॉलेज, बेळगाव येथे पीयूसी द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या अमनने या स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. त्याने १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच कर्नाटकाच्या ४×१०० मीटर मेडले रिले संघाचा तो सदस्य होता. या संघानेही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदकावर नाव कोरले.

अमनने वैयक्तिक प्रकारांमध्येही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. ५० मीटर बॅकस्ट्रोक आणि २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये त्याने चौथे स्थान मिळवले.

 belgaum

राष्ट्रीय स्तरावरील या कामगिरीतून अमनची जलतरणातील सातत्य, मेहनत आणि समर्पण अधोरेखित झाले आहे. त्याच्या या यशामुळे जैन पीयू कॉलेज, बेळगाव तसेच कर्नाटकाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.

अमनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, शिक्षक आणि बेळगावकरांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.