belgaum

धोकादायक ठरलेल्या मार्गावर उपाययोजना सुरू;

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर
येळ्ळूर ग्रामस्थांनी निसरडा रस्ता, बेदरकार अवजड वाहतूक आणि वाढत्या अपघातांबाबत दिलेल्या निवेदनाची अशोका बिल्डकॉन कंपनीने तातडीने दखल घेतली आहे.

ग्रामस्थांच्या मागण्यांनुसार कंपनीने संबंधित ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्ती व स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली असून, वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी उद्यापासून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

हलगा–मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर मार्गावर निसरडा चिखल, साचलेली माती आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वारंवार अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कंपनीकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या.

 belgaum

रस्त्यावरील निसरडेपणा दूर करण्यासाठी साफसफाई आणि दुरुस्ती सुरू करण्यात आली असून, कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येळ्ळूरवासीयांनी व्यक्त केलेल्या प्रमुख समस्यांवर तातडीने कार्यवाही सुरू झाल्याचे दिसून येत आहे.


ग्रामस्थांनी कंपनीच्या या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत केले असले, तरी सर्व आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होऊन रस्ता सुरक्षित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.