belgaum

केपीसीसी अध्यक्षपदासाठी सतीश जारकीहोळी यांच्या नावाला प्राधान्य

0
Satish jarkiholi
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मोठ्या राजकीय घडामोडी घडत असलेल्या कर्नाटक राज्यात सिद्धरामय्या यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता केपीसीसी अध्यक्षपदासाठी नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.

राज्य काँग्रेसचे प्रभावी नेते विद्यमान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नावाचा केपीसीसी अध्यक्षपदासाठी काँग्रेस हाय कमांड गांभीर्याने विचार करत असल्याचे कळते. पक्षातील महत्त्वाच्या बदला संदर्भात एआयसीसी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्यासमोर केपीसीसीचे सारथ्य करण्याचा प्रस्ताव मांडला असल्याचे वृत्त आहे.

राज्यामध्ये पक्षाला बळकट करून पुढे नेण्यास जाकीहोळी हेच योग्य नेते आहेत, असे हाय कमांडचे मत असल्याचे समजते. हाय कमांडचा प्रस्ताव सतीश जारकीहोळी यांनी मान्य केला असला तरी त्यासाठी एक अट घातली आहे.

 belgaum
Satish jarkiholi

पक्ष संघटनेच्या जबाबदारी बरोबरच त्यांचे सध्या भूषवत असलेले मंत्रीपद कायम ठेवले जावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कोणतेही सरकारी अधिकार नसताना फक्त पक्षाचे अध्यक्षपद घेऊन जनहितार्थ कार्य करणे सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशक्य असल्याचे जारकीहोळी यांनी हाय कमांडला कळवले असल्याचे कळते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.