belgaum

शिवजयंती मिरवणूक मार्गाचे महापौरांकडून होणार निरीक्षण

0
733
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये २१ एप्रिल रोजी निघणाऱ्या ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने सोमवारी महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांना मागण्यांचे निवेदन देऊन नियोजनावर चर्चा करण्यात आली.

मिरवणूक मार्गावर प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारणे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे आणि ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबाबत महामंडळाने आग्रही मागणी केली आहे.

 belgaum

या शिष्टमंडळात महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, गुणवंत पाटील, प्रसाद मोरे यांच्यासह नगरसेवक संतोष पेडणेकर, गिरीश धोंगडी व जयतीर्थ सौंदती यांचा समावेश होता.

मिरवणुकीदरम्यान आपत्कालीन मदतीसाठी पोलीस, हेस्कॉम आणि आरोग्य विभागाचा समावेश असलेला संयुक्त मदत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि रात्री उशिरापर्यंत उपहारगृहे सुरू ठेवण्याबाबतही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

महापौर प्रीती कामकर आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी लवकरच मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या नागरी सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमुळे यंदाचा शिवजयंती सोहळा अधिक शिस्तबद्ध आणि सुविधेसह पार पडण्याची चिन्हे आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.