Home बातम्या “बेळगाव शहरात डी.जे./कर्कश ध्वनिवर्धक वापरास बंदी”
belgaum

“बेळगाव शहरात डी.जे./कर्कश ध्वनिवर्धक वापरास बंदी”

0
“बेळगाव शहरात डी.जे./कर्कश ध्वनिवर्धक वापरास बंदी”
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :
बेळगाव शहरात सण-उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमवर पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. कर्कश ध्वनीमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनीप्रदूषण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


पोलीस आयुक्त कार्यालयाकडून 24 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, 7 मार्च 2026 पासून पुढील आदेशापर्यंत शहरात डीजे, डॉल्बी यांसारख्या उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 2000 वॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या साऊंड सिस्टीमवर विशेषतः निर्बंध घालण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लग्नसमारंभासाठी केवळ मर्यादित क्षमतेचे साऊंड सिस्टीम वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आवाजाची मर्यादा 75 डेसिबलपर्यंत ठेवणे बंधनकारक राहणार आहे.


तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनिवर्धक वापरण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.


दरम्यान, कोणताही गोंधळ किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्वरित 112 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.