belgaum

कपिलेश्वर मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन

0
307
 belgaum

बेळगाव लाईव्ह:

श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता. २) हे शिबिर पार पडले. यामध्ये एकूण ७५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते पूजा करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी मंदिरातर्फे रक्तदाता गट नोंदणी प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, यामध्ये १६० हून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.

कापिलेश्वर मंदिरातर्फे पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात आला असून, पुढील काळात असे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्याच उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. या शिबिरासाठी केएलई हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

 belgaum

या कार्यक्रमास मंदिराचे सचिव अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, राजू भातकांडे, अजित जाधव, राकेश कलघटगी, प्रथमेश कावळे, जोतिबा कावळे, अविनाश खन्नुकर, अभय लगाडे, प्रताप बाचोळकर, अभि पवार, महेश सांबरेकर, रमेश देसुरकर आदी सेवेकरी व ट्रस्टी उपस्थित होते.

यानंतर सायंकाळी ७ वाजता कापिलेश्वर मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. ही वेबसाईट अमर हुंद्रे व सर्वेश चव्हाण पाटील यांनी विकसित केली आहे. यावेळी अभिजीत चव्हाण यांनी वेबसाईटबाबत माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत ऑनलाईन माध्यमातून मंदिराची माहिती उपलब्ध होती; मात्र अधिकृत आणि अचूक माहिती भाविकांपर्यंत पोहोचावी, यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.

मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे इतर राज्यांतील भाविकांनाही मंदिराबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी मंदिरात पालखी सोहळा व महाआरती पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.