belgaum

अपघातांची मालिका रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांची आक्रमक भूमिका

0
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नियम धाब्यावर बसवणारे चालक आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या रस्ते विकास अभियंत्यांना त्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून ट्रॅक्टरवर बसवलेले २०० हून अधिक हाय-डेसिबल स्पीकर्स जप्त करण्यात आले आहेत.

ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि लक्ष विचलित करणाऱ्या अशा उपकरणांवर यापुढेही कारवाई सुरू राहील. तसेच, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर्स लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या वाहनांना रिफ्लेक्टर्स नसतील, ती वाहने थेट जप्त करण्याचे आदेश के. रामराजन यांनी दिले आहेत.

 belgaum
SP RAMRAJAN

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करताना के. रामराजन म्हणाले की, महामार्गावर लेन मार्किंग नसल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. जर तातडीने लेन मार्किंगचे काम पूर्ण झाले नाही, तर संबंधित विभागाच्या अभियंत्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात रस्ते अपघातात ८४ जणांचा बळी गेला होता, यंदा हा आकडा ६८ वर आला आहे. हा मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे के. रामराजन यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.