belgaum

रस्त्यावर खोदलेल्या ‘या’ धोकादायक चरीकडे एल अँड टी लक्ष देईल का?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली कॉर्नर येथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेली मोठी चर गंभीर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असून दुरुस्तीचे काम त्वरेने संपवून रस्ता पूर्ववत सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीकडून गणाचारी गल्ली कॉर्नर येथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी चर खोदण्यात आली आहे. रस्त्याच्या वळणावर करण्यात आलेले हे खोदकाम सध्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. विशेष करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर असलेल्या या चरीच्या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर बाब काल रात्री तेथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या निदर्शनास येताच जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या चौगुले यांनी खोदलेल्या चरीच्या सभोवती मोठे दगड ठेवून पादचारी, वाहन चालकांना सतर्क करण्याचे स्तुत्य कार्य केले.

 belgaum

तथापि या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे अपघाताचा धोका पूर्णपणे टळलेला नसून एल अँड टी कंपनीने आपले दुरुस्तीचे काम त्वरेने संपवून खोदलेली चर बुजवावी आणि रस्ता पूर्ववत सुरक्षित करावा, अशी मागणी परिसरातील वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.