belgaum

नशेतील युवकाकडून अंमली पावडरीसह 1.21 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
909
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावातील गोगटे सर्कल जवळील रेल्वे स्थानक रस्त्यावर नशेत असलेल्या एका युवकाला सीसीबी पोलिसांनी काल अटक करून त्याच्या जवळील 90 हजार रुपये किमतीच्या एमडीएमए या निद्राजन्य औषध असलेल्या अंमली पदार्थाच्या पावडरीसह एकूण 1,21,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव वर्धन आनंद कांबळे (वय 19 रा. जनता प्लॉट, पिरनवाडी बेळगाव) असे आहे. वर्धमान याने दुसरा एक आरोपी अर्जुन तहसीलदार (रा. अनगोळ बेळगाव) याच्याकडून एमडीएमए हे बंदी असलेले निद्राजन्य औषध आणि भुकटी अर्थात पावडर घेतली होती.

त्यांचे सेवन करून तो नशेमध्ये गोगटे सर्कल जवळील रेल्वे स्थानक रस्त्याच्या ठिकाणी वावरत असल्याची माहिती मिळताच सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन वर्धन कांबळे याला ताब्यात घेतले.

 belgaum

तसेच त्याच्या जवळील 90,000 किमतीची 8.92 ग्रॅम एमडीएमए पावडर, 30,000 रुपये किमतीचा एक वन प्लस फाईव्ह जी मोबाईल फोन आणि रोख 1,900 रुपये असा एकूण 1 लाख 21 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात वर्धन व अर्जुन या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.