belgaum

रणकुंडये परिसरात गोवा बनावटीचा दारूचा साठा जप्त

0
1581
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील गावचा रणकुंडये परिसरातील रस्त्यावरून अक्रमितपणे गोवा राज्यातील दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर रविवारी अबकारी विभागाने धाड टाकून मोठा साठा जप्त केला.

खात्रीलायक माहितीनुसार बेळगाव विभागाच्या अबकारी अधिकाऱ्यांनी कारवाई केली. सीपीआय मंजुनाथ मेल्लिगेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धाड यशस्वी केली. कच्च्या मार्गाने गोवा राज्यातून दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.

तपासणीदरम्यान सुमारे ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये २०५ लिटर गोवा बनावटीची दारू तसेच २५ लिटर ओरॅक दारूचा समावेश आहे.

 belgaum

पोलीस पथकाने कारवाई सुरू करताच संशयित आरोपीने कार घटनास्थळीच सोडून पलायन केले. संबंधित कार जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.