belgaum

मराठा सेंटर बेळगाव येथे 21 फेब्रु.पासून अग्निवीर भरती मेळावा

0
Maratha centre logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील उत्कृष्ट खेळाडू आणि माजी सैनिक, सेवारत सैनिकांची मुले व बंधूंसाठी येत्या शनिवार दि. 21 फेब्रुवारी 2026 पासून अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लर्क आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

युनिट मुख्यालय कोटा (यूएचक्यू) अंतर्गत हा भरती मेळावा शिवाजी स्टेडियम, मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे होणार आहे. अग्निवीर जीडी अर्थात अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्निवीर क्लर्क आणि अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे इतकी असावी, म्हणजेच उमेदवार 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान जन्मलेला असावा.

भरती मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांनी स्वतःसोबत पुढील मूळ कागदपत्रे आणणे आवश्यक असणार आहे. : 1) मूळ शिक्षण प्रमाणपत्रे, 2) मूळ नातेसंबंध प्रमाणपत्र, 3) तहसीलदारांनी स्वाक्षरी केलेले जात समुदाय प्रमाणपत्र (सर्व जातीसाठी), 4) गावातील सरपंचांनी स्वाक्षरी केलेले चारित्र्य प्रमाणपत्र, 5) शाळा सोडल्याचा दाखला, 6) तहसीलदारांनी स्वाक्षरी केलेले जन्मस्थान अथवा कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र,

 belgaum
Mlirc

7) पोलीस अधीक्षकांनी स्वाक्षरी केलेले पोलीस पडताळणी प्रमाणपत्र, 8) गावातील सरपंचांनी स्वाक्षरी केलेले अविवाहित प्रमाणपत्र, 9) क्रीडा प्रमाणपत्र, 10) सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींचे दोन संच,

11) लागू असल्यास एनसीसी प्रमाणपत्र, 12) इतर सर्व संबंधित कागदपत्रे आणि 25 पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे. सैन्य नोंदणी ही केंद्र सरकारची संस्था असल्यामुळे सर्व कागदपत्रे ‘हिंदी’ किंवा ‘इंग्रजी’ भाषेत असणे आवश्यक आहे.

उपरोक्त अग्निवीर भरती संदर्भातील नोंदणी, सेवा, डिस्चार्ज, खेळ, रोजगार, रजा, वेतन, भत्ता आणि संबंधित फायदे वगैरें बाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.joinindianarmy.nic.in वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.