बेळगाव लाईव्ह :रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैष्णवी रणजीत माळगे या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तातडीने शस्त्रक्रियेची गरज असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर -मुडसिंगी रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात वैष्णवी माळगे ही गंभीररित्या जखमी झाली आहे. वेस्टर्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स कोल्हापूर येथे उपचार घेत असलेल्या वैष्णवी हिचा जीव वाचविण्यासाठी तिच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
सदर शस्त्रक्रियेसाठीचा खर्च 5,00,000 रुपये इतका असून आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या माळगे कुटुंबीयांसाठी हा खर्च आवाक्या बाहेरचा आहे. तरी दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संघसंस्थांनी याची नोंद घेऊन वैष्णवीच्या शस्त्रक्रियेसाठी प्रत्यक्ष किंवा सोबत दिलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून आपल्यापरीने होईल तितके अर्थसहाय्य करावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी मोबाईल संपर्क
अश्वजीत रमेश चौधरी
7353786804
रणजीत कालिदास माळगे
7499585105





