बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाने सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि मराठी भाषेच्या वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी हा उद्देश ठेवून आज सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी गिरीश कॉम्प्लेक्स , भगतसिंग सभागृह या ठिकाणी प्राथमिक ,उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत बेळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन समारंभा प्रसंगी येळ्ळूर मराठी ग्रामीण साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. नागेश बोभाटे हे अध्यक्षस्थानी होते .याप्रसंगी व्यासपीठावर स्नेहलता वाय. चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी प्रा.डॉ. सरिता मोटराचे(गुरव) ,कॅन्टोन्मेंट शाळा बेळगावचे शिक्षक महेश कुंभार. साक्षी कणबर्गी, अनुजा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत मोटराचे यांनी केले सूत्रसंचालन अमोल जाधव आणि आभार प्रदर्शन सुरज पाटील यांनी केले.यावेळी राम पाखरे ,योगेश सुळगेकर ,मंथन कुगजी, ऋषिकेश मजुकर आणि इतर सदस्य उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल
प्राथमिक विभाग
प्रथम क्रमांक दूर्वा हेबाळकर मराठी शाळा हिंडलगाव सुळगा
द्वितीय क्रमांक सर्वज्ञा मोदगेकर मराठी विद्यानिकेतन
तृतीय क्रमांक समिधा मेलगे मराठी विद्यानिकेतन
उत्तेजनार्थ तनुजा काजोलकर मराठी विद्यानिकेतन
उच्च प्राथमिक विभाग
प्रथम क्रमांक भूमी भातकांडे बालिका आदर्श विद्यालय
द्वितीय क्रमांक सृजन पाटील मराठी विद्यानिकेतन
तृतीय क्रमांक पूर्वी घाडी सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर
उत्तेजनार्थ सार्थक पाटील
माध्यमिक विभाग
प्रथम क्रमांक हर्षदा भातकांडे एस.डी.ए. शाळा वडगाव
द्वितीय क्रमांक साईराज गुरव मराठी विद्यानिकेतन
तृतीय क्रमांक वैष्णवी कुंडेकर महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर
उत्तेजनार्थ मनाली बोराटै मराठी विद्यानिकेतन
विजेत्या स्पर्धकांचा गौरव संमेलनात करण्यात येईल.




