belgaum

बेळगावात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, १० वर्षांची मुलगी जखमी

0
578
Street dogs
Street dogs
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील रयत गल्ली परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, सोमवारी एका १० वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला करून तिला जखमी केले.

या घटनेमुळे गल्लीतील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रयत गल्लीतील रहिवासी निविका जितेंद्रसिंह राठोड हिला रविवारी दुपारी कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचारानंतर सोमवारी तिला घरी आणण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही कुत्री वाहनांचे व इतर साहित्याचे नुकसान करत असल्याने नागरिक त्रस्त होते.

 belgaum

आता थेट मुलांवर हल्ले सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.