बेळगाव. लाईव्ह: कर्नाटक राज्य शासनाच्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण अंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील 13 लाख 65 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या माध्यमातून 50 लाख 44 हजार 819 जणांची माहिती शासनाला उपलब्ध झाली आहे.
बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असल्यामुळे निर्धारित वेळेत जिल्ह्यातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासन समोर होते. आता सर्वेक्षणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला तरी जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार 788 घरांचे सर्वेक्षण ती घरे बंद असल्यामुळे झालेले नाही.
सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात 10 हजार 803 विभाग तयार करण्यात आले होते जिल्ह्यातील 12 लाख 39 हजार 572 घरांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र या उद्दिष्टापेक्षा जास्त घरांचे सर्वेक्षण झालेले आहे.
जिल्ह्यात बैलहोंगल तालुक्यातील सर्वेक्षणाचे प्रमाण 125.16 टक्के इतके सर्वाधिक आहे. बैलहोंगल तालुक्यापाठोपाठ अथणी तालुक्याचा (122.32 टक्के) क्रमांक लागतो.
सर्वेक्षणाचा तपशील (अनुक्रमे तालुक्याचे नांव, झालेले सर्वेक्षण टक्क्यांमध्ये यानुसार) पुढील प्रमाणे आहे. अथणी : 96.43, बैलहोंगल : 125.16, बेळगाव : 92.00, चिक्कोडी : 86.52, गोकाक : 87.81, हुक्केरी : 96.95, कागवाड : 99.97, खानापूर : 103.34, कित्तूर : 77.12, मुडलगी : 104.06, निपाणी : 122.32, रामदुर्ग : 91.36, रायबाग : 95.59, सौंदत्ती : 97.63, यरगट्टी : 98.64.



