मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंगळूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून शिमोगा, चिक्कमंगळूर आणि हासन जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, तर बेळगाव आणि कोडगू जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या किनारपट्टींच्या प्रदेशात आज 5 जुलै रोजी सकाळी 8:45 वाजल्यापासून क्केनौकास्प अलर्ट घोषित करण्यात आला. पुढील तीन तासात अतिवृष्टीचा अंदाज असल्यामुळे मंगळूर, उडपी वगैरे जिल्ह्यात हा अलर्ट जारी केला गेला होता.
दरम्यान किनारपट्टीच्या प्रदेशात आणखी दोन दिवस म्हणजे 6 व 7 जुलै रोजी देखील ऑरेंज अलर्ट असणार असून त्यानंतर 11 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी असणार आहे. तसाच येलो अलर्ट बेळगाव, चिक्कमंगळूर, हासन व शिमोगा जिल्ह्यांमध्ये देखील लागू असेल. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी मंगळूर जिल्ह्यातील शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली होती.