बेळगाव लाईव्ह : राजा लखमगौडा (हिडकल) धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, यंदा १८.८२ टक्के पाणीसाठा कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम आगामी काळात पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो.
राजा लखमगौडा (हिडकल) धरणाची एकूण क्षमता ५१ टीएमसी आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी धरणात केवळ २७.२० टीएमसी पाणी शिल्लक आहे.
तर, मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २० फेब्रुवारी २०२४ रोजी हा साठा ३३.५०६ टीएमसी होता. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत १८.८२टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.
या घटत्या पाणीसाठ्याचा शेतीसह उद्योगधंदे आणि रोजच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यातील पाणी व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.