बेळगाव लाईव्ह :सध्याच्या कुंभमेळा-2025 दरम्यान होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून येत्या 14 फेब्रुवारी 2025 पासून रेल्वे क्र. 07383/ 07384 एसएसएस हुबळी -वाराणसी -एसएसएस हुबळी (युबीएल-बीएसबी-युबीएल) कुंभमेळा विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे.
सदर कुंभमेळा विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या 14 फेब्रुवारीपासून दर शुक्रवारी व सोमवारी एसएसएस हुबळी ते वाराणसी आणि वाराणसी ते एसएसएस हुबळी अशा प्रत्येकी 3 फेऱ्या करेल.
रेल्वे क्र. 07383 ही कुंभमेळा विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या शुक्रवारी म्हणजे दि. 14, 21 व 28 फेब्रुवारी 2025 रोजी एसएसएस हुबळी येथून वाराणसीला प्रस्थान करेल.
त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 07384 ही कुंभमेळा विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या सोमवारी म्हणजे दि. 17 व 24 फेब्रुवारी
तसेच 3 मार्च 2025 रोजी वाराणसी येथून एसएसएस हुबळीच्या दिशेने प्रवासाला निघेल. सदर विशेष एक्सप्रेस रेल्वे 18 कोचेस अर्थात डब्यांची असणार आहे.