बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील प्रमुख गाव असलेल्या नंदगड येथे महालक्ष्मी देवीची यात्रा होत आहे. या निमित्ताने खानापूर ते नंदगड या मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक वाढणार आहे.
या परिस्थितीत प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी एक मोठी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
खानापूर ते नंदगड या मार्गावर प्रचंड मोठे स्पीडब्रेकर घालण्यात आले आहेत. ते स्पीड ब्रेकर रंगवण्यात आलेले नसल्यामुळे दिवसाच्या उजेडात ही दिसत नाहीत. यामुळे अनेकदा दुचाकीस्वार आणि कारचालक स्पीडब्रेकर वरून उडून पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतच असून डोक्याला मार लागून गंभीर जखमा होत असल्याचेही सामोरे येत आहे.
वाढीव रहदारीच्या काळात स्पीडब्रेकर न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यात्रा उरकून रात्रीच्या वेळी परतणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे यामुळे खानापूर ते नंदगड या मार्गावरील स्पीड ब्रेकर रंगवण्याची आणि ते दर्शवण्यासाठी काही फलक लावण्याची ही गरज आहे.
पुढे गतिरोधक आहे किंवा स्पीड ब्रेकर अहेड अशा पद्धतीच्या फलकांची सध्या गरज निर्माण झाली असून भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे.
तालुका पंचायत खानापूर, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच स्थानिक आमदारांनी या प्रकाराकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा यात्रा काळात अपघात घडून अनर्थ निर्माण होऊ शकतो. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी वाहतूक वाढलेली असते, याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी अनेक वाचकांनी बेळगाव लाईव्ह कडे व्यक्त केली.