बेळगाव लाईव्ह : कन्नड रक्षण चित्रदुर्ग येथे केलेल्या दादागिरीला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटक येथील चित्रदुर्ग येथे काल कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील एसटीला काळं फासत मराठी एसटी चालकाला देखील काळं फासत मारहाण केली होती.त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटकच्या एसटींवर भगवा झेंडा फडकत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने महाराष्ट्र सरकार मराठी माणसाच्या बाजूने नसून कर्नाटकच्या बाजूने असल्याचा आरोप ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी केला.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कन्नड लोकं मोठ्याप्रमाणात राहतात त्यामुळे शिवसेना जर रस्त्यावर उतरली तर कन्नड लोकांना पळताभुई थोडी होईल असा इशाराही देवणे यांनी यावेळी दिला.
शुक्रवारी रात्री कर्नाटक इथल्या चित्रदुर्ग येथे कर्नाटकात यायचं असेल तर तुम्ही कन्नड बोलावं लागेल असे सांगत कन्नड रक्षण विधिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एसटीला काळापासून आणि मराठी भाषेत बस वाहकाला देखील काळा बसला होते या घटनेचे संतप्त प्रतिसाद बेळगाव सह सीमा भाग आणि महाराष्ट्रातून उमटत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोल्हापुरातील शिवसेना नेते विजय देवणे आणि आंदोलन केलं.