बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या ऐतिहासिक आनंदवाडी कुस्ती आखाड्यात अमेरिका भारत आणि इराणचे मल्ल उतरणार असून 9 मार्च रोजी हे मैदान भरणार आहे.
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने या आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून नुकताच जिल्हा कुस्तीकर संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिका इराण आणि भारताच्या दिग्गज मल्लांना या मैदानात कुस्तीसाठी उतरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यंदाच्या कुस्ती मैदानात पहिल्यांदाच अमेरिकेचे पैलवान येणार असल्याने या मैदानाची उत्सुकता निर्माण झाली आहे याशिवाय इतर 70 काटाजोड कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कुस्ती संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिरजे यांनी दिली आहे.
ज्या पैलवानांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावे नोंदवायची आहेत त्यांनी सुधीर बिर्जे व्हाट्सअप क्रमांक 9901766030 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेकडून प्रॅडीला पैलवान तर हिरांकडून सोहेल पैलवान, हादी पैलवान, आणि मिलाद पैलवान तर भारताकडून महेंद्र गायकवाड , सिकंदर शेख, शिवा महाराष्ट्र, आणि दादा शेळके हे आनंदवाडी च्या आखाड्यात उतरणार असून यंदाच्या आखाड्याचे खास वैशिष्ट्य ठरणार आहेत.