Sunday, December 22, 2024

/

अपहरण-हनीट्रॅप प्रकरणी चौघांना अटक : शहापूर पोलिसांची कारवाई

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हनीट्रॅप आणि अपहरण प्रकरणाबाबत बेळगाव शहापूर पोलिसांनी चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहापूर पोलीस ठाण्यात अपहरण आणि हनीट्रॅप संदर्भात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातील आरोपींना अटक करून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विनायक सुरेश कुरडेकर (रा. मंगळवार पेठ टिळकवाडी, बेळगाव) यांच्या ओळखीतील दिव्या प्रदीप सपकाळे नामक तरुणीने झोपलेल्या अवस्थेत आपल्या खांद्यावर हात ठेवल्याचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ समोर ठेवून इतर तीन आरोपींना हाताशी धरून अपहरण केल्याचे भासवत 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. यानुसार विनायक कुरडेकर यांनी 15 लाख रुपये रक्कम देऊ केली. मात्र उर्वरित 10 लाख रुपये देण्यासाठी त्यांना त्रास देण्यात आला. या प्रकरणी त्यांनी शहापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग, डीसीपी रोहन जगदीश, गुन्हे व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अर्स, मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक.एस.एस.सिमानी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने तपास सुरु केला.

हे प्रकरण अपहरण-हनीट्रॅप असल्याचे लक्षात येताच दिव्या प्रदीप सपकाळे (वय : 23 रा. बसवान गल्ली, शहापूर बेळगाव), प्रशांत उर्फ स्पर्श कल्लाप्पा कोलकार (वय: 25 वर्षे रा. गाडे मार्ग शहापूर बेळगाव) कुमार उर्फ डॉली अर्जुन गोकरक्कनवरा (वय 29 रा. ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी, बेळगाव) आणि राजू सिद्राय जडगी (वय: 29 रा. वाल्मिकी गल्ली कणबर्गी, बेळगाव) या चौघांना अटक करण्यात आली आहे.Shahapur police

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 13,40,000/- रोख, गुन्ह्यात वापरलेले 3 मोटारसायकल व एक मोबाईल फोन असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

तपास पथकात शहापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस.एस. सिमानी, एएसआय बी.ए. चौगला, आर.आय. नंदी, सीएचसी नागराज ओसप्पागोळ, शिवशंकर गुड्डापगोळ, सीपीसी श्रीधर तलवार, जगदीश हदिमानी, संदीप बागडी, सिद्धराम मुगलवार, महिला कर्मचारी श्रीमती कावेरी कांबळे, कु. प्रतिभा कांबळे यांचा समावेश होता. या कार्रवाईतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

गांजा विकणाऱ्या एकास अटक

बेळगाव: हिरेबागेवडी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून हलगा जवळील सर्विस रोड येथे गांजा विकणाऱ्या एका तरुणास अटक करून त्याच्या जवळील 22 हजार किंमतीचा अर्धा किलो गांजा जप्त केला आहे. पिराजी यल्लाप्पा येसोचे वय 31 रा. हलगा असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

बेळगावात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेलवर छापा

बेळगाव शहरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉज वर धाड टाकत शहर गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई एकास अटक केली आहे.

उद्यमबाग जवळील नामांकित कॉलेज जवळील एका लॉज वर धाड टाकत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी हॉटेल मॅनेजर आणि मालकाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणी उद्यमबाग पोलिसांनी एकास अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.