Friday, January 3, 2025

/

तारेच्या कुंपणाने सुरक्षित केले जाणार मंगाईनगर तलाव

 belgaum

बेळगाव  लाईव्ह:मंगाईनगर तलावात वडगावच्याच एका युवकाचा  मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने स्थानिक रहिवाशांच्या मागणीनंतर मंगाई नगर येथील दोन्ही तलावांना सध्या तात्पुरते तारेचे कुंपण करण्याचा निर्णय घेतला.

मंगाईनगर, वडगाव येथील तलावातील कालच्या आत्महत्येच्या घटनेनंतर आज शुक्रवारी सकाळी मंगाईनगर येथील दोन्ही तलावांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार या तलावांना तारेचे तात्पुरते 6 फुटी संरक्षक कुंपण घातले जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी मंगाईनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर आणि श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी तलावासह मंगाईनगरवासियांच्या समस्यांची अधिकाऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी महापालिका कंत्राटदार आर नागराज, अभियंते सचिन कांबळे, परशराम पी.एन., अजय चव्हाण, ईश्वर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्रीधर बिर्जे, आनंद गोंधळी यांच्यासह मंगाईनगरवासीय बहुसंख्येने उपस्थित होते.Mangai nagar lake

मंगाईनगर तलावामध्ये काल गुरुवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मंगाईनगर येथील दोन्ही तलावांचे व्यवस्थित बांधकाम करण्यात आलेले नाही.

या तलावाजवळ प्राथमिक शाळा आणि अनेक घर आहेत त्यामुळे लहान मुलांची लोकांची वर्दळ असते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी तलावांना कुंपण घालण्याची मागणी या आधीपासूनच होत होती  त्यामुळे कालच्या घटनेनंतर प्रशासनाने जागे होऊन सदर निर्णय घेतला आहे

या तलावांना संरक्षक कठडे नसल्यामुळे अलीकडच्या काळात हे तलाव स्थानिक रहिवाशांसाठी धोकादायक बनले होते. मात्र आता महापालिकेतर्फे या तलावासभोवती तूर्तास तारेचे तात्पुरते कुंपण घालून ते सुरक्षित केले जाणार असल्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.