बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील पूरग्रस्त ठिकाणे तसेच अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा आखला होता.
या दौऱ्यादरम्यान कागवाड तालुक्यातील जुगुळ येथे पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्री समर्थक तरुणाला विजेचा जबर धक्का बसल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला आहे.
२२ वर्षीय महेश नामक तरुण मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी छतावर चढला होता अशी माहिती उपलब्ध झाली असून त्याच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
जखमी तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी तैनात असलेल्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.