Wednesday, September 11, 2024

/

मुख्यमंत्र्यांनी केली गोकाक पूरग्रस्त भागाची पाहणी

 belgaum

बेळगाव  लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी (दि. ५) गोकाक तालुक्यातील विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज विशेष विमानाने सांबरा विमानतळावर आले आणि रस्त्याने गोकाक शहरात पोहोचले.

मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असलेल्या घटप्रभा नदीने बुडालेल्या लोळसूर पुलाची त्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी नवीन पूल बांधण्याची विनंती केली. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी उपस्थित होते.

लोळसूर पुलाजवळ आठवडाभरापासून बॅकवॉटरने तुंबलेल्या गोकाकमधील मटण मार्केट, कुंभार गल्ली, उप्पर गल्ली, भोजगर गल्ली आदी भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
संकेश्वर-यरगट्टी राज्यमार्गावरील लोळसूर पूल हा खूप जुना असून दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जात असल्याने त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे उंच पूल बांधण्याची गरज असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.Cm flood

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुरामुळेबाधित कुटुंबांना आश्रय देण्यासाठी गोकाक येथील शासकीय म्युनिसिपल कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट दिली आणि लोकांशी चर्चा केली.

घरांमध्ये पाणी शिरताच अधिकाऱ्यांनी आम्हाला निवारा केंद्रात हलवून सर्व प्रकारची व्यवस्था केली, असा दिलासा पीडित कुटुंबांनी व्यक्त केला.पीडितांना जेवण आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.