Wednesday, September 11, 2024

/

बळ्ळारी नाल्याची तात्काळ स्वच्छता, कॉंक्रिटीकरणाची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरालगतच्या बळ्ळारी नाल्याची युद्धपातळीवर स्वच्छता करून त्याचे कॉंक्रिटीकरण केले जावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ वडगाव, बेळगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

शेती सुधारणा युवक मंडळाचे प्रमुख व पळणारी नाला समितीचे चेअरमन कीर्तीकुमार कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

बेळगाव शहरा लगतचा सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणारा बळ्ळारी नाला हा 32 कि.मी. लांबीचा आहे. सध्या हा नाला उंच गवत, झाडे-झुडपे आणि जलपर्णीने अडवला गेला आहे. सदर तुंबलेल्या नाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेत पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याचबरोबर बेळगाव शहर आणि लगतच्या गावातील विहिरी आणि कुपनलिकांचे पाणी खराब होत आहे.Farmers

बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी बेळगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुमारे 600 एकर जमिनीतील भात पिकांचे नुकसान होते. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन सदर नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करून नाल्याचे काँक्रीट बांधकाम करावे ही विनंती, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी शेती सुधारणा युवक मंडळाचे प्रमुख अमोल देसाई, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, रमाकांत कोंडुसकर यांच्यासह माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, महेश जुवेकर, राजू मरवे, माधुरी बिर्जे, महादेव धामणेकर, गुरुराज शहापूरकर, मनोहर गडकरी, पांडुरंग पाटील, लक्ष्मण शिंदे, भाऊराव पाटील, रमेश हावळानाचे, मोहन सालगुडी, नंदकुमार गडकरी, हिराचंद चौगुले प्रभाकर पाटील, श्रीधर बिर्जे आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.