Friday, December 27, 2024

/

आरपीडी क्रॉस येथे पाणी साचण्यास उंच रस्ता कारणीभूत -मनपा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील आरपीडी कॉर्नर येथे आयडीबीआय बँकेच्या शेजारील 2022 पासून सातत्याने पाणी तुंबणाऱ्या खुल्या गटारीमध्ये नागरिक पडून असंख्य अपघात झाले तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही.

अलीकडेच एक्स (पूर्वीचे ट्विटर) युवासमितीबीजीएम हँडलने केलेल्या तक्रारीनंतर बेळगाव महापालिकेच्या अभियंत्यांनी सदर ठिकाणी भेट दिली आणि त्यांचे निष्कर्ष जारी केले.

गंमत म्हणजे युवसमितीबीजीएमची तक्रार ही भाग्यनगर क्रॉस येथे साचणाऱ्या पाण्याबाबत होती. परंतु महापालिकेच्या अभियंत्यांनी चुकून आरपीडी क्रॉसची पाहणी केली आणि आपला निष्कर्ष दिला.

महापालिकेच्याच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने अलीकडच्या काळात बांधलेल्या खानापूर रोड हा नाल्यासह काँक्रीटचा मुख्य रस्ता आजूबाजूच्या भागापेक्षा उंच आहे. रस्त्याचे बांधकाम करताना पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी जागा ठेवलेली नाही.

त्यामुळे पावसाचे पाणी साचते. तथापी सध्या साचलेले पाणी साफ झाल्याचा अहवाल सीसीबीने दिला आहे. दरम्यान सातत्याने तक्रारी करूनही आरपीडी क्रॉस येथे पाणी तुंबण्याची समस्या कायम आपल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

तेंव्हा महापालिकेच्या संबंधित अभियंत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर पाणी तुंबण्याची समस्या कायमची निकालात निघेल या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.