Tuesday, January 7, 2025

/

चंदगड मधून प्रभाकर खांडेकर प्रयत्नशील

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केवळ चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना चंदगड आजरा गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)कडे जाणार की शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडे जाणार यावर आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान चंदगड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते ,राज्यसभा सदस्य संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघ मशाल कडे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडेच राहावी याबाबत चर्चा करण्यात आली.

चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे आहेत तर मागील विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अशा परिस्थितीमध्ये महायुती कुणाला उमेदवारी देणार आणि महाविकास आघाडी मध्ये चंदगड मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.Khandekar

एकीकडे असे असताना मग दुसरीकडे मात्र बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील शिनोळी गावचे युवा उद्योजक व निष्ठावंत उपजिल्हा प्रमुख म्हणुन काम करत असलेले प्रभाकर खांडेकर यांनी उद्धव ठाकरे गटातून चंदगड मतदारसंघातून उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

खांडेकर यांनी उमेदवारी मागताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा देखील केली आहे. त्यामुळे ही जागा मशाल म्हणजेच उ.बा.ठा. पक्षाला मिळाली तर चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व बेळगाव सिमा भागातील मराठी बांधवां मध्ये चैतन्य निर्माण होईल चंदगड विधानसभा मतदारसंघात भगवा फडकेल. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.