बेळगाव लाईव्ह :कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ (केआयएडीबी) कित्तूर मार्गे नव्या बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेली 155 एकर जमीन अद्याप संपादित करू शकलेले नाही.
त्यामुळे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत खासदार शेट्टर यांनी भू-संपादनातील अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक बोलावण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.
या संदर्भात केआयएडीबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 644 एकर जागा आवश्यक आहे. तथापि, कोंडुसकोप्प, देसूर आणि इतर तीन गावांतील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बेळगाव जिल्ह्यातील 155 एकर जमीन रेल्वे मार्गासाठी संपादित करणे कठीण जात असून लक्षणीय आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
याव्यतिरिक्त रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या संरेखनात बदल करण्यास नकार दिल्याने विलंब होत असल्याचेही केआयएडीबी अधिकाऱ्यांनी नमूद केले. रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या 600 एकरपैकी धारवाड ते हिरेबागेवाडीपर्यंत 322 एकर जमीन यापूर्वीच संपादित करण्यात आली आहे.
बेळगावजवळील कुरुविनकोप्प येथील जमिनीसह उर्वरित 155 एकर जमिनीचे संपादन करणे बाकी आहे. खासदार शेट्टर यांनी या भू-संपादनाच्या निकडीवर भर देत “प्रलंबित भू-संपादनाबाबत बैठक बोलावून समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात यावा,” असे स्पष्ट केले आहे.