Thursday, June 20, 2024

/

श्रीधर माळगी जागतिक जलतरण स्पर्धेसाठी होतोय जर्मनीला रवाना

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील भारतीय पॅरा जलतरणपटू श्रीधर नागप्पा माळगी हा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू येथून आयडीएम बर्लिन वर्ल्ड पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज -2024 या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनीला रवाना होत आहे.

सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा श्रीधर माळगी 50 मी. फ्रीस्टाइल, 200 मी. आणि 400 मी वैयक्तिक मेडले स्पर्धांमध्ये भाग घेईल. वयाच्या सहाव्या वर्षी एका भयंकर ऑटो अपघातात एखाद गमवावा लागलेल्या श्रीधर याला बसवेश्वर सर्कल येथील रोटरी कॉर्पोरेशन जलतरण तलावाने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारी संधी होती.

जलतरण गुरू उमेश कलघटगी यांनी श्रीधरमधील क्षमता ओळखून पोहण्याचे आमंत्रण दिले. श्रीधरच्या “हो” च्या जोरदार आवाजाने एक नवीन अध्याय सुरू झाला. प्रशिक्षण परवडण्याची चिंता असतानाही त्याच्या पालकांनी पाठिंबा दिला.

 belgaum

श्रीधरचा स्पर्धात्मक जलतरणाच्या जगातील प्रवास 2012 मध्ये उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. तेंव्हापासून, श्रीधरने त्याच्या नावावर 19 आंतरराष्ट्रीय आणि 52 राष्ट्रीय पदके जमा असून ज्यामध्ये असाधारण 36 सुवर्ण, 11 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. श्रीधर याने पोहण्याच्या बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि फ्रीस्टाइल या प्रकारात विषेश प्रावीण्य मिळवले आहे.Shreedhar malagi

बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव (ऑलिम्पिक आकार) येथे श्रीधर त्याचे प्रशिक्षक उमेश कलघटगी सर, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी आणि संध्याकाळी 3 तास प्रशिक्षण घेतो.

श्रीधरला डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी) यांचे महत्त्वपूर्ण समर्थन आणि प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाऊंडेशन), एसएलके ग्रुप बंगलोर, अलाईड फाउंड्रीज बेळगाव, पॉलिहाइड्रॉन फाउंडेशन, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, डॉ. राजेंद्र भांडणकर व इतरांचेही प्रोत्साहन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.